Showing posts with label डीजेचे कवित्व. Show all posts
Showing posts with label डीजेचे कवित्व. Show all posts

Monday, September 7, 2026

डीजेचे कवित्व ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
डीजेचे कवित्व
उलट सुलट प्रतिक्रियांनी,
डीजेचा मुद्दा गाजू लागला.
नको त्या मुद्द्यांचा डीजे,
जोर जोरात वाजू लागला.
डीजेच्या ज्वलंत मुद्द्याला,
नको नको तसे वळण आहे.
अस्तिकता आणि नास्तिकता,
याचे विनाकारण दळण आहे.
डीजेच्या वाढत्या गदारोळात,
जो तो नवे मुद्दे पुरवू लागला !
मराठी भाषेच्या शुद्ध उच्चारात,
डीजे बंदीचा मुद्दा हरवू लागला !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9391
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
7 सप्टेंबर 2026

 

डीजेचे कवित्व ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- डीजेचे कवित्व उलट सुलट प्रतिक्रियांनी, डीजेचा मुद्दा गाजू लागला. नको त्या मुद्द्यांचा डीजे, जोर ...