Showing posts with label घुसखोरी. Show all posts
Showing posts with label घुसखोरी. Show all posts

Monday, April 20, 2026

घुसखोरी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
घुसखोरी
खोटे खोटे बोलत रहा,
खरे बोलायचीही चोरी आहे.
हल्ली जिकडे बघावे तिकडे,
घुसखोरी एके घुसखोरी आहे.
घुसखोरीसाठी घुसखोरांच्या,
शक्कलीवर शक्कली आहेत
अस्सलपणाचा अभाव सारा,
सगळे घुसखोर नकली आहेत.
घुसखोरांच्या उलट्या बोंबा,
आम्हाला घुसखोर म्हणू नका !
आमचे आम्ही बघून घेऊ,
आम्हाला चव्हाट्यावर आणू नका !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9253
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
20 एप्रिल 2026

 

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...