Sunday, October 9, 2022

शिवसेनेची नामोनिशानी.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

शिवसेनेची नामोनिशानी

ज्यांची शक्यता नव्हती,
तेसुद्धा फुटले गेले.
धनुष्यबाणाचे चिन्ह,
तात्पुरते गोठले गेले.

तात्पुरते गोठले तरी,
भविष्य मात्र धोक्यात आहे!
लोकांची खात्री पटली
केवढी ताकद खोक्यात आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8069
दैनिक झुंजार नेता
9ऑक्टोबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...