Monday, October 17, 2022

आधी केले मग सांगितले... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

आधी केले मग सांगितले

आधी निर्णय घेतला जातो,
मग त्याचे लॉजिक मांडले जाते.
आपल्या लॉजिकचे दळण,
चर्चेच्या जात्यातून कांडले जातात.

जमेल तशी कांडाकांडी असते,
जमेल तशी भांडाभांडी असते!
आपला निर्णय लादण्याची,
हीच खरी राजकीय गुंडी असते!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6610
दैनिक पुण्यनगरी
17ऑक्टोबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...