Wednesday, October 26, 2022

ग्रहणफल ... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

ग्रहणफल

बदनामीचे दुःखही,
आनंदाने समजून घ्यावे लागते.
म्हणून प्रकाशाच्या सम्राटालाही,
ग्रहणामधून जावे लागते.

झाकाळलो गेलो म्हणजे,
संपलो असा अर्थ होत नाही.
अंधाराच्या साम्राज्यात,
जुंपलो असा अर्थ होत नाही.

दाटलेला अंधार म्हणजे,
घडी दोन घडीचा डाव असतो !
झाकाळून टाकल्याचा,
अंधारप्रिय लोकांचा आव असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6616
दैनिक पुण्यनगरी
26ऑक्टोबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...