Friday, October 14, 2022

पावसाचा राग ... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

पावसाचा राग

ढगफुटीमागे ढगफुटी,
पावसाळ्याचा काय हेतू आहे?
यंदा पावसाळा ओरडून सांगतोय,
मीसुद्धा एक स्वतंत्र ऋतू आहे.

आधी होतो अंधार,
मग मुसळधार कोसळू लागतो.
विजांचा कडकडाट करीत,
तुंबाडलेला ढग ढासळू लागतो.

जागतिक तापमान बदल वगैरे,
पाऊस असले काही जाणत नाही!
पावसाचा खरा राग हा की,
ढगफुटीला ढगफुटी मानत नाही!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8068
दैनिक झुंजार नेता
14ऑक्टोबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका1मे2024....वर्ष- तिसरे..अंक -329वा

दैनिक वात्रटिका 1मे2024....वर्ष- तिसरे.. अंक -329वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1SKSAr47sK4Q1UvZWU2ieg6xoOa...