Wednesday, October 19, 2022

बोधामृत... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

बोधामृत

विरोधाला विरोध झाले,
बिनविरोधालाही विरोध झाले.
उलट सुलट चर्चा झाल्या तरी,
त्यातून व्हायचे तेच बोध झाले.

ज्याला स्वत:च बोध घेता येतो,
त्याला बोधामृत पाजणे बरे नाही !
ठकास महाठक असेल तरी,
संशयकल्लोळ माजणे बरे नाही!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-8073
दैनिक झुंजार नेता
19ऑक्टोबर2022

 

No comments:

खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  -------------------- खोके आणि धोके  खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे.  खोक्या आणि धोक्याच...