Saturday, October 8, 2022

मेळाव्यांची जुगलबंदी... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

मेळाव्यांची जुगलबंदी

एकीकडे गद्दार होते,
दुसरीकडे खुद्दार होते.
आज्यापाडून नातावांपर्यंत,
उद्धार एके उद्धार होते.

मर्यादांचे सिमोलंघन करून,
आपापले शस्त्र पूजन केले!
पोरकटपणाचे प्रदर्शन करीत,
पोरकटपणाचे भजन झाले !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8068
दैनिक झुंजार नेता
8ऑक्टोबर2022

 

No comments:

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...