Saturday, October 15, 2022

चमत्कार... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

चमत्कार

आता मात्र डोळ्यासमोर,
अंधेरी यायची पाळी आहे.
शिवसैनिकाच्या हातावर,
कॉम्रेडची टाळी आहे.

सैनिकांच्या जय महाराष्ट्रला,
कॉम्रेडचा लाल सलाम आहे!
जणू बदलत्या काळाचा,
प्रत्येक जणच गुलाम आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8069
दैनिक झुंजार नेता
15ऑक्टोबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...