Friday, October 14, 2022

उर्मट विचार.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

उर्मट विचार

बावळटपणा उघड झाला की,
धार्मिक भावना दुखू लागतात.
आपल्या लंगड्या समर्थनाला,
बिनडोकपणाचे टेकू लागतात.

निधर्मीपणाचा आव तरी,
प्रत्येकाच्या धर्म डोक्यात असतो.
कुणी चिकित्सा केली की,
प्रत्येकाचा धर्म धोक्यात असतो.

याचा अर्थ मात्र असा नाही,
प्रत्येकच धार्मिक कर्मठ असतो!
जो ठेवतो दांभिकतेवर बोट,
धर्मांधांसाठी तो उर्मट असतो!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6607
दैनिक पुण्यनगरी
14ऑक्टोबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका1मे2024....वर्ष- तिसरे..अंक -329वा

दैनिक वात्रटिका 1मे2024....वर्ष- तिसरे.. अंक -329वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1SKSAr47sK4Q1UvZWU2ieg6xoOa...