Wednesday, October 5, 2022

पावसाळी सभा... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

पावसाळी सभा

पावसात भाषण आहे की,
भाषणात पाऊस आहे?
पावसातल्या भाषणाची,
लाटेबरोबरच हौस आहे.

वक्त्याबरोबर श्रोतेही,
पावसामध्ये भिजू लागले.
पावसातली भाषणं तर,
दरवेळीच गाजू लागले.

येरे येरे पावसा...
कार्यकर्त्यांचा धावा आहे !
पावसाळी सभांचा,
विरोधकांनाही हेवा आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8060
दैनिक झुंजार नेता
5ऑक्टोबर2022

 

No comments:

वर्धापन दिन

आजची वात्रटिका -------------------- वर्धापन दिन जसे एकाचे दोन झाले, तसे दोनाचे चार झाले. जिकडे बघावे तिकडे, वर्धापन दिन फार झाले. ज्यांचा त्...