Saturday, October 29, 2022

नोटांवरची फोटोलॉजी... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

नोटांवरची फोटोलॉजी

नोटांवर महापुरुषांचे फोटो हवेत,
राजकारणी आग्रह धरू लागले.
सगळे कॅश करून झाल्यासारखे,
आता नोटाही कॅश करू लागले.
तुमच्या भावना सच्चा असतील,
त्याचे प्रदर्शन असे थिल्लर नको.
झाले तेवढे अवमूल्यन पुरे आहे,
महापुरुषांची पुन्हा चिल्लर नको.
देव आणि देवतांच्या विटंबनेला,
चलनातून पुन्हा नवी चालना नको !
राष्ट्रपित्याच्या बंद्या रुपयाची,
भावनेपोटी कुणाशी तुलना नको!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6618
दैनिक पुण्यनगरी
29ऑक्टोबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...