Saturday, October 8, 2022

सत्याचा गर्भपात.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

सत्याचा गर्भपात

मतपेटीवरती डोळा ठेवून,
आज सोयीचे मौन पाळले जाते.
आपल्या गैरसोईचे असले की,
आज खरे बोलणेही टाळले जाते.

जिभेवर खेळते सरस्वती ज्यांच्या,
त्यांचीही भूमिका खटकली जाते.
ज्यांना जाणते म्हणावे त्यांचीही,
जीभ टाळ्याला चिटकली जाते.

बळ एकवटून बोलणारालाही,
आज एकटे पडल्यासारखे वाटते!
सूर्यप्रकाशासारखे सत्यही,
हकनाक गाभडल्यासारखे वाटते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6602
दैनिक पुण्यनगरी
8ऑक्टोबर2022

 

No comments:

खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  -------------------- खोके आणि धोके  खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे.  खोक्या आणि धोक्याच...