Monday, October 10, 2022

नि:पक्ष टंचाई.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

नि:पक्ष टंचाई

असे काही घडू लागले,
जे पूर्वी कधीच पाहिले नाही.
निःपक्ष असे काहीच,
आपल्या देशात राहिले नाही.

जेवढा पक्षांना ऊत आहे,
तेवढाच अपक्षांनाही ऊत आहे !
निःपक्ष काही शोधावे तर,
त्याचे सत्ताधाऱ्यांशी सूत आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6603
दैनिक पुण्यनगरी
10ऑक्टोबर2022

 

No comments:

daily vatratika...28feb2025