Saturday, October 15, 2022

शॉकप्रूफ... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

शॉकप्रूफ

कुणाला जुळे झाले आहेत,
कुणाला तिळे झाले आहेत.
फुटीचे धक्के खात खात,
पक्ष खिळखिळे झाले आहेत.

खिळखिळेपणा एवढा की,
आता धक्केच बासेनासे झाले.
फाटाफूटीशिवाय पक्षही,
आपल्याला सोसेनासे झाले.

बचेंगे तो और भी लडेंगे,
स्वत:लाच दिलासा आहे !
आपल्या शॉकप्रूफपणाचा,
जाहीरपणे खुलासा आहे !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6608
दैनिक पुण्यनगरी
15ऑक्टोबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...