Saturday, October 8, 2022

श्रद्धेचा खेळ..... मराठी वात्रटिका

श्रद्धेचा खेळ

-----------------

 लोकांच्या श्रद्धांशी

दांभिक खेळत आहेत.

लोकांनाही कळत नाही,

जरी पुन्हा पोळत आहेत.


अंधश्रद्धा होते श्रद्धा,

तरी लोकांना कुठे जाग असते?

कुणी केला पर्दाफाश की,

दांभिकतेच्या बुडाखाली आग असते !!


-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)

  मोबा.९९२३८४७२६९


No comments:

खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  -------------------- खोके आणि धोके  खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे.  खोक्या आणि धोक्याच...