Wednesday, October 19, 2022

पावसाची रडकथा ... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

पावसाची रडकथा

कितीही ढग फोडले तरी,
ढगफुटी म्हणायचा पत्ता नाही.
ढगफुटीसदृश हा शब्द,
केवळ आज आणि आत्ता नाही.

मला परतीचा म्हणू शकता,
अवकाळी गाभडेही म्हणू शकता.
तुमचे अंदाज चुकणारच,
तरीही ढगात गोळ्या हाणू शकता.

नैसर्गिक समतोल ढासळलेला,
त्यामुळे मलाही ढासळावे लागते!
बळीराजाची अवस्था बघत नाही,
तरीही मला कोसळावे लागते!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6610
दैनिक पुण्यनगरी
19ऑक्टोबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका1मे2024....वर्ष- तिसरे..अंक -329वा

दैनिक वात्रटिका 1मे2024....वर्ष- तिसरे.. अंक -329वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1SKSAr47sK4Q1UvZWU2ieg6xoOa...