Tuesday, October 4, 2022

शब्दपूजा ... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

शब्दपूजा

शब्द हे शस्त्र आहे,
ते शस्त्रासारखेच वापरले पाहिजे.
ज्यांना ज्यांना ढोपरायला हवे,
त्यांना त्यांनां ढोपरले पाहिजे.

शब्द हे शस्त्र आहे तर,
वेळोवेळी ते उजळले पाहिजेत!
शब्दांची धार तेजाळावी म्हणून,
शब्द वेळोवेळी पाजळले पाहिजेत!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8059
दैनिक झुंजार नेता
4ऑक्टोबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...