Showing posts with label शब्दपूजा ... मराठी वात्रटिकाआजची वात्रटिका. Show all posts
Showing posts with label शब्दपूजा ... मराठी वात्रटिकाआजची वात्रटिका. Show all posts

Tuesday, October 4, 2022

शब्दपूजा ... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

शब्दपूजा

शब्द हे शस्त्र आहे,
ते शस्त्रासारखेच वापरले पाहिजे.
ज्यांना ज्यांना ढोपरायला हवे,
त्यांना त्यांनां ढोपरले पाहिजे.

शब्द हे शस्त्र आहे तर,
वेळोवेळी ते उजळले पाहिजेत!
शब्दांची धार तेजाळावी म्हणून,
शब्द वेळोवेळी पाजळले पाहिजेत!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8059
दैनिक झुंजार नेता
4ऑक्टोबर2022

 

खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  -------------------- खोके आणि धोके  खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे.  खोक्या आणि धोक्याच...