Tuesday, October 18, 2022

बिनविरोध.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

बिनविरोध

कोणतीही निवडणूक असो,
ते बिनविरोध करू शकतात.
सोकावलेले मतदार मात्र,
खात्रीने उपाशी मरू शकतात.

लोकशाही जगली पाहिजे,
मतदार राजा जगला पाहिजे!
बिनविरोध निवडणुकीचा,
एकदाचा निकाल लागला पाहिजे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8072
दैनिक झुंजार नेता
18ऑक्टोबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...