Tuesday, October 4, 2022

चलो मुंबई... मराठी वात्रटिका

 

आजची वात्रटिका
---------------------------

चलो मुंबई...

सैनिक म्हणाला सैनिकाला,
चला जीवाची मुंबई करू.
त्यांचे येतील,आपले येतील,
आपलीच आपण तुंबई करू.

टाळ्याला टाळ्या देत राहू,
हश्याला हश्याही देत राहू.
घोडा मैदान आमने-सामने,
आपली झाडाझडती घेत राहू.

विचार करून करून,
डोक्याचे मात्र खोक्के आहे!
तरी आपण म्हणत राहू,
सगळे कसे ओक्के आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6598
दैनिक पुण्यनगरी
4ऑक्टोबर2022

No comments:

daily vatratika...29jane2026