Sunday, October 16, 2022

घराणेशाहीचा निषेध.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

घराणेशाहीचा निषेध

कुणाचा मुलगा,कुणाची मुलगी,
कुणाचा नातीसोबत नातू आहे.
घराणेशाहीला विरोध करणे,
सर्वच सग्यासोयऱ्यांचा हेतू आहे.

घराणेशाहीला विरोध करायला,
कुणाची आई,कुणाची बहीण आली.
जावयाचा हात धरीत,
कुणाच्या सासूसह विहीण आली.

सख्खे आले,चुलत निलत आले,
सावत्रपणाची कुठे हिंमत आहे ?
घराणेशाहीच्या निषेधाचा ठराव,
अगदी बहुमतासह संमत आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6609
दैनिक पुण्यनगरी
16ऑक्टोबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...