Wednesday, October 5, 2022

मेळाव्यांचा दसरा... मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
---------------------------

मेळाव्यांचा दसरा

कुठे पक्षांचा 'फड'फडाट असतो,
कुठे नेत्यांचा 'गड'गडाट असतो.
कुठे नुसताच बडबडाट होतो,
कुठे टाळ्यांचा कडकडाट असतो.

कार्यकर्ता तितुका मेळवला जातो,
गर्दीचाच खेळ खेळवला जातो.
भक्ती - शक्तीच्या प्रदर्शनासाठी,
गर्दीचा आकडा जुळवला जातो.

खाऊगर्दी आणि भाऊगर्दीने,
गर्दीचा विक्रम मोडला जातो !
दसऱ्याच्याच मुहूर्तावर,
मेळाव्यांचा दसरा काढला जातो !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6599
दैनिक पुण्यनगरी
5ऑक्टोबर2022

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...