Thursday, August 6, 2020

शाई आणि थुका

आजची वात्रटिका
----------------------------

शाई आणि थुका

बोटावर शाई लावून,
बोटावर खेळवले जाते.
लोकांना चितपट करून,
लोकशाहीला लोळवले जाते.

या बोटावरून त्या बोटावर,
सातत्याने थुका असतो !
लोक आणि लोकशाहीला,
सातत्याने धोका असतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5881
दैनिक पुण्यनगरी
6ऑगस्ट2020


No comments:

खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  -------------------- खोके आणि धोके  खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे.  खोक्या आणि धोक्याच...