
आजची वात्रटिका
----------------------------
राजकीय तुच्छता
फक्त राजजारण गलिच्छ?
की राजकारणी गलिच्छ आहेत?
राजकारण की राजकारणी?
नेमके कोण तुच्छ आहेत ?
खरी परीक्षा त्यांची नाहीच,
परीक्षा लोकशाही तत्वाची आहे !
राजकीय तुच्छतेपेक्षाही,
राजकीय स्वच्छता महत्त्वाची आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7365
दैनिक झुंजार नेता
5ऑगस्ट2020
No comments:
Post a Comment