Monday, August 17, 2020

तफावत

 आजची वात्रटिका

----------------------------

तफावत

नात्यात आणि गोत्यात,
खूप थोडे मार्जिन आहे.
नात्या-गोत्याचे राजकारण,
आपल्याला धार्जिन आहे.

आपल्या नात्या-गोत्यासाठी,
ते सतत खपताना दिसतात !
आपली होते ताटातूट,
ते नाती जपताना दिसतात !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5889
दैनिक पुण्यनगरी
17ऑगस्ट2020

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...