Saturday, August 15, 2020

झेंडा वंदन

 आजची वात्रटिका

----------------------------

झेंडा वंदन

ही दुर्दैवी वस्तुस्थिती आहे,
हा काही आमचा भास नाही.
यंदा कोरोनाच्या कृपेने,
झेंडावंदनाचा त्रास नाही.

कुणाला आनंद तर,
कुणाला दुःख वाटत असेल.
कुणाला हे पटेल,
कुणाला हे पटत नसेल.

देशभक्त आणि देशद्रोही,
ठरवायचे हे मोजमाप नाही !
तिरंगा कोरोनाला सांगतोय,
आम्हांला हरविण्याची,
येड्या तुझ्यात टाप नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
15ऑगस्ट2020

No comments:

daily vatratika...29jane2026