Monday, August 10, 2020

कोरोनाशी संवाद

आजची वात्रटिका
----------------------------

कोरोनाशी संवाद

कोरोनाने धरला,
माझ्याभोवती गोल.
कुत्सितपणे बोलला,
शरण येतोस का बोल?

मी धैर्याने उत्तरलो,
हाच खरा मुद्दा आहे.
तू मायावी असशील तर,
मीही कोरोना योद्धा आहे.

माझ्यासारख्या योद्ध्यांची
इथे कोट्यावधी फौज आहे !
उद्या लोक हसत म्हणतील,
कोरोना एक मौज आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5884
दैनिक पुण्यनगरी
10ऑगस्ट2020


No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...