Showing posts with label चौकशी. Show all posts
Showing posts with label चौकशी. Show all posts

Sunday, April 25, 2021

चौकशी

आजची वात्रटिका
---------------------

चौकशी

कुणी शंभर कोटी उच्चारताच,
मनात शंका दाटू लागली.
आपलीही सीबीआय चौकशी,
होण्याची भीती वाटू लागली.

त्यामुळेच कोटीच्या मामल्यात,
हल्ली कुणी पडत नाही !
सीबीआय मागे लागले की,
मग ईडीही सोडत नाही!!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7579
दैनिक झुंजार नेता
25एप्रिल2021

 

Monday, August 24, 2020

चौकशी

आजची वात्रटिका
-----------------------------

चौकशी

आडवे-तिडवे काही नाही,
सगळे सरळ,सरधोपट आहे.
ज्याचे मिठू मिठू चाललेय,
तो म्हणे 'बोलका पोपट' आहे.

आज इथल्या उंदराची साक्ष,
इथल्या मांजरा-मांजरा आहे !
सीबीआय कडून चौकशी करा,
पोपटाला कुणाचा पिंजरा आहे?

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-5895
दैनिक पुण्यनगरी
24ऑगस्ट2020

लपाछपीचा खेळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- लपाछपीचा खेळ समाजकारणाआडचे राजकारण, लपविणे नेहमीच जड होत जाते. समाजकारणाआडचे राजकारण, कधी ना कधी उघड होत...