Saturday, January 20, 2024
खादडांचे घोटाळे...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका
-------------------------
खादडांचे घोटाळे
खा खा खाल्ले तरी,
अजून कुणाचेच पोट भरले नाही.
त्यांनी खायचे राहिले आहे,
असे अजून तरी काही उरले नाही.
खादाडांसाठी सत्ता म्हणजे,
कल्पवृक्ष आणि कामधेनू आहे.
म्हणूनच तर द्रौपदीच्या थाळीत,
दरवेळी नवा नवा मेनू आहे.
कालपर्यंत एकत्र खाल्लेले,
एकमेकांचे घास मोजू लागातात !
कुठल्याही घोटाळ्यांची प्रकरणं,
तेव्हाच तर गाजू लागतात!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8456
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
20जानेवारी 2024
Subscribe to:
Post Comments (Atom)
दैनिक वात्रटिका l 4 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 305वा l पाने -57
दैनिक वात्रटिका l 4 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 305वा l पाने -57 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1VDZIPmnz1bKXOaj5nbZ...

-
आजची वात्रटिका ---------------------- गेट-टुगेदर भूतकाळातले मित्र -मैत्रिणी, खूप वर्षानंतर भेटू लागले. उजळून येतात आठवणी, छोटे झाल्यासारखे व...
No comments:
Post a Comment