Wednesday, January 3, 2024

रडण्याचे विश्लेषण...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
रडण्याचे विश्लेषण
कुणी कॅमेऱ्यासमोर रडते आहे,
कुणी कॅमेऱ्यामागे रडते आहे.
तिची ज्ञान... अदा बघून बघून,
एकच रामायण घडते आहे.
ती कॅमेऱ्यासमोर रडली की,
चॅनेलचे टीआरपी वाढू लागतात.
समर्थक आणि विरोधकही,
एकमेकांवर तुटून पडू लागतात.
कॅमेऱ्यासमोरच्या आसवांचा,
आज वैचारिक बाजार आहे !
तथाकथित संस्कृती अडकलेली,
स्त्रीमुक्ती आज बेजार आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------
फेरफटका-8439
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
3जानेवारी 2024

No comments:

दैनिक वात्रटिका l 31मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 301वा l पाने -54

दैनिक वात्रटिका l 31मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 301वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1S4SAD0tMR_eqzmeUqaS...