Thursday, January 11, 2024

न्याय आणि अन्याय...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

न्याय आणि अन्याय

खरे असो वा खोटे सो,
न्यायदेवता पुरावे मागत असते.
खोट्यापेक्षा खऱ्याचीच परीक्षा,
इथे न्यायदेवता बघत असते.

खोटे नाटे पुरावे देऊन,
खोटे आपलेच खरे करून घेते.
सत्याला मरण नाही म्हणत,
खरे आपला हट्ट पुरे करून घेते.

खोट्याची चीड यायची तर,
खऱ्याचीच कीव येऊ लागते !
सत्याच्या पाठीराख्यांचाही मग,
अंगामध्ये हिव येऊ लागते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8447
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
11जानेवारी 2024
 

No comments:

आचार विचार .....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- आचार विचार भ्रष्टाचाऱ्यांच्या अनुभवातून, इतरांनीही काही शिकावे लागते. खाणारा कोणीही असला तरी, त्या...