Monday, January 8, 2024

नाटकांचा तमाशा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

नाटकांचा तमाशा

आधी महाराष्ट्राच्या राजकारणात,
म्हणे कट्यार पाठीत घुसली होती.
नंतर म्हणे,आता होती कुठे गेली ?
असा प्रयोग करीत बसली होती.

महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर,
नव्या नव्या नाटकांची नांदी आहे.
सारेच सज्जन असले तरी,
तो मी नव्हेच म्हणायची संधी आहे.

विच्छा माझी पुरी करा म्हणीत,
संशयकल्लोळाला जागा ठेवली आहे !
कुणाला बेईमान वाटू लागली,
ती तर हिमालयाची सावली आहे !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8444
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
8जानेवारी 2024
 

No comments:

गोबेल्स नीती...आजची वात्रटिका ...दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका ----------------------------- गोबेल्स नीती जेवढा गंदा,तेवढाच अंधा, असा युद्धाचा धंदा आहे. दावे प्रतिदावे होऊ लागले, कोण मेला?...