आजची वात्रटिका
-------------------------
मार्केटिंग थिअरी
एकदा गिर्हाईक तयार केले की,
वाट्टेल त्याचा खप होऊ लागतो.
गिऱ्हाईकांची गरज निर्माण केली की,
वाट्टेल त्याचा जप होऊ लागतो.
आपल्या मूळ उद्दिष्टांची,
सगळी कशी लपवालपी सुरू होते.
जे पाहिजे;जसे पाहिजे त्याची,
सगळी कशी खपवाखपवी सुरू होते.
ढिले असलेले बाजाराचे नियम,
हळूहळू मग सक्त होऊन जातात !
एकदा गरज व्यसन झाले की,
गिर्हाईकांचेही भक्त होऊन जातात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8455
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
19जानेवारी 2024

No comments:
Post a Comment