Tuesday, January 2, 2024

मोस्ट वॉन्टेड...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
-------------------------

मोस्ट वॉन्टेड

ज्याचे त्यालाच भोगावे लागते,
ते तर राजकीय संचित आहे.
महाविकास आघाडीच्या चर्चेत,
मोस्ट वॉन्टेड तर वंचित आहे.

ही काही पोकळ चर्चा नाही,
हाच तर राजकीय मूड आहे.
राजकारणाने उगवलेला,
हाच तर राजकीय सूड आहे.

राजकीय मूड किंवा सूड,
जे आहे ते मात्र वास्तव आहे !
जिथे काल गोडी गुलाबी होती
त्यांच्याच मध्ये आज विस्तव आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8438
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
2 जानेवारी 2024

No comments:

दैनिक वात्रटिका8मे2024....वर्ष- तिसरे..अंक -336वा

दैनिक वात्रटिका 8मे2024....वर्ष- तिसरे.. अंक -336वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1XewNOM-fFB8BoGskcn2d3Hm3EQ...