Friday, January 5, 2024

लोकभावनेचा विजय असो !...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

लोकभावनेचा विजय असो !

कुणी खातडावर बोलू नका,
कुणी पेताडावर बोलू नका.
खरे काय ?खोटे काय?नंतर बघू,
तुम्ही मात्र तोंड खोलू नका.

खाताडाला खाताड म्हणू नका,
पेताडाला पेताड म्हणू नका.
कुणी कितीही गाताड असले तरी,
त्यालासुद्धा गाताड म्हणू नका.

हाती पुरावे- बिरावे घेवून,
कुणी उगीच नाचू-बिचू नका !
लोकभावना महत्त्वाच्या आहेत,
रेड्यापुढे कुणी वेद वाचू नका !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8441
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
5जानेवारी 2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...