Saturday, January 6, 2024

दिलासा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

दिलासा

लोकशाहीचा चौथा खांब,
पायाखाली ठिसूळ होतो आहे.
कुठलाही न्यूज चॅनल लावा,
यालाच तो दुजोरा देतो आहे.

कशाला हसावे? कशाला रडावे?
याला कसलाच निकष नाही.
जिथे जिथे टाकायला हवा,
नेमका तिथे तिथेच फोकस नाही.

इलेक्ट्रॉनिक पाठोपाठ सोशलही,
भलतच व्हायरल होतो आहे !
संथपणे का होईना प्रिंट मीडिया,
लोकशाहीला दिलासा देतो आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8442
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
6जानेवारी 2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका8मे2024....वर्ष- तिसरे..अंक -336वा

दैनिक वात्रटिका 8मे2024....वर्ष- तिसरे.. अंक -336वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1XewNOM-fFB8BoGskcn2d3Hm3EQ...