Monday, January 1, 2024

2023 म्हणाले 2024 ला....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

2023 म्हणाले 2024 ला

तू उतू नकोस ;मातू नकोस,
घेतलं वसा तर टाकूच नकोस.
इलेक्शन स्पेशल असलास तरी,
खोटी आश्वासने फेकूच नकोस.

तू जरी 'लीप ईयर' असलास तरी,
ओठांचा मात्र चंबू करू नकोस.
गद्दारांना प्रोत्साहन देऊन,
आमच्यासारखा येडबंबू ठरू नकोस.

सारे गम मी घेऊन जातो,
तुझ्या हाती मात्र खुशी देत आहे !
बाळा 2024 जरा सावध रहा...
आपली गद्दे पंचविशी येत आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8437
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
1 जानेवारी 2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका8मे2024....वर्ष- तिसरे..अंक -336वा

दैनिक वात्रटिका 8मे2024....वर्ष- तिसरे.. अंक -336वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1XewNOM-fFB8BoGskcn2d3Hm3EQ...