आजची वात्रटिका
-------------------------
वर्तमानाची दक्षता
इतिहासात डोकावून बघा,
इतिहास फक्त जेत्यांचाच आहे.
ज्यांच्या ज्यांच्या हाती सत्ता होती,
इतिहासही फक्त त्यांचाच आहे.
इतिहास सोयीने लिहिला जातो,
जेव्हा कधी वर्तमान गाफील होतो.
सोयीच्याच पुराव्यांनीच मग,
भविष्यालाही इतिहास अपील होतो.
इतिहास आणि भविष्यासाठीही,
वर्तमानाने जागे राहिले पाहिजे !
इतिहासाला भविष्यात नाही,
वर्तमानात तपासून पाहिले पाहिले !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8440
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
4जानेवारी 2024
No comments:
Post a Comment