Wednesday, January 31, 2024

भ्रमाचा भोपळा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

भ्रमाचा भोपळा

दिसूनसुद्धा आंधळे बनले की,
लपाछपी खेळायला मजा येते.
कळूनही न कळल्यासारखे केले की,
कुणालाही छळायला मजा येते.

पुढच्याला चितपट केले तरी,
त्याला मग जिंकल्याचा भास होतो.
पाठीराख्यांनी जल्लोष केला की,
सगळाच कार्यक्रम खास होतो.

डोक्यातली हवा निघून गेली की,
वास्तवाची जाणीव होऊ लागते !
आभाळाला घातलेली गवसणीही,
ज्याची त्याची उणीव होऊ लागते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8466
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
31जानेवारी 2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...