आजची वात्रटिका
----------------------------
अयोध्या वारी
राजकीय वारे फिरल्याबरोबर,
अयोध्येच्या वाऱ्या वाढू लागल्या.
वैचारिक फेरबदल एवढे की,
अयोध्येच्या फेऱ्या वाढू लागल्या.
लोकांना राजकारणच दिसते,
कदाचित हा भक्तीभाव असू शकतो!
उद्याच्या राजकारणाचा,
कदाचित हा नवा डाव असू शकतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-6046
दैनिक पुण्यनगरी
30जानेवारी2021

No comments:
Post a Comment