आजची वात्रटिका
----------------------------
इतिहासाची उजळणी
कधी कधी ऐतिहासिक
पुड्या सोडल्या जातात.
कधी कधी इतिहासाच्या
खपल्या काढल्या जातात.
इतिहास जोपरला जातो,
इतिहास वापरला जातो.
इतिहास लाथाळला जातो,
इतिहास ढोपरला जातो.
इतिहासाचे साधन बनवून,
आपले साध्य साधले जाते !
एकाचे ऐतिहासिक सत्य,
दुसऱ्याला बाधले जाते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-7488
दैनिक झुंजार नेता
3जानेवारी2021

No comments:
Post a Comment