Saturday, January 9, 2021

कोंबडी म्हणाली कोंबड्याला

आजची वात्रटिका
------------------------

कोंबडी म्हणाली कोंबड्याला

सोशल डिस्टन्सिंग पाळ, तुला प्यारा तुझा जीव आहे. आपलाही कोराना आला, त्याचे नाव बर्ड फ्ल्यू आहे.

नको मिरवूस तूही तोरा, आवर जरा त्या चोंबड्याला ! अंडे घोळत खुराड्यात बस कोंबडी म्हणाली कोंबड्याला !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------------------- चिमटा-6026 दैनिक पुण्यनगरी 9जानेवारी2021

 

No comments:

गर्दीचा शोध...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- गर्दीचा शोध पक्ष फुटले;नेते फुटले, प्रचार सभांना गर्दी आहे. जरूर आपला मतदार राजा, खरोखरच दर्दी आहे...