Tuesday, January 5, 2021

सूडबुद्धी

आजची वात्रटिका
----------------------------

सूडबुद्धी

पाहिजे त्यात घट होऊन, नको त्यात वृद्धी आहे. झपाट्याने वाढतेय, ती राजकीय सूडबुद्धी आहे.

राजकीय सूडाची भावना, सतत ध्यानी मनी आहे. राजकीय सूडबुद्धीला, दररोज खतपाणी आहे.

याच्या मनात द्वेष, त्याच्या मनात आग आहे ! हाती सत्ता येईल त्याच्या, सूडबुद्धीला जाग आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------- चिमटा-6022 दैनिक पुण्यनगरी 5जानेवारी2021

 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...