Sunday, January 10, 2021

सत्तेची उजळणी

आजची वात्रटिका
------------------------

सत्तेची उजळणी

एकीची बेकी होऊन, कुणाचीही आघाडी होऊ शकते. दोघांमध्येही दुही निर्माण होऊन, त्रिकुटाचीही तिघाडी होवू शकते.

मौके पे चौका मारला तरी, संघर्ष पाचवीला पुजलेला असतो. कितीही छे छे म्हटले तरी, सत्ता संघर्ष माजलेला असतो.

आठा-आठी, वाटा-घाटी, सगळ्यांच्या नाकी नऊ येतात ! सगळेच दस नंबरी असल्याने, पक्के वैरी  सख्खे भाऊ होतात !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------------------- चिमटा-6027 दैनिक पुण्यनगरी 10जानेवारी2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका16एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -314 वा

 दैनिक वात्रटिका 16एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -314 वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1G5mOqAClp46gmC8flF6...