Tuesday, January 5, 2021

बिनविरोधचा ठोका

आजची वात्रटिका
----------------------------

बिनविरोधचा ठोका

बिनविरोध निवडणूक हे मोठे गोंडस नाव आहे. ग्राम पंचायतीमध्ये पदाचा, जगजाहीर लिलाव आहे.

बिनविरोध हीसुद्धा, पंचायत झाली आहे. प्रत्यक्ष लोकशाहीची, गावोगावी बोली आहे.

यांचे बघून त्यांचा, बिनविरोधचा 'ठोका' आहे ! गल्लीपासून दिल्लीपर्यंत, लोकशाहीला धोका आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------------------- फेरफटका-7490 दैनिक झुंजार नेता 5जानेवारी2021
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...