Showing posts with label इतिहास ढोपरला जातो.. Show all posts
Showing posts with label इतिहास ढोपरला जातो.. Show all posts

Sunday, January 3, 2021

इतिहासाची उजळणी

आजची वात्रटिका
----------------------------

इतिहासाची उजळणी

कधी कधी ऐतिहासिक पुड्या सोडल्या जातात. कधी कधी इतिहासाच्या खपल्या काढल्या जातात.

इतिहास जोपरला जातो, इतिहास वापरला जातो. इतिहास लाथाळला जातो, इतिहास ढोपरला जातो.

इतिहासाचे साधन बनवून, आपले साध्य साधले जाते ! एकाचे ऐतिहासिक सत्य, दुसऱ्याला बाधले जाते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------------ फेरफटका-7488 दैनिक झुंजार नेता 3जानेवारी2021

 

लपाछपीचा खेळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- लपाछपीचा खेळ समाजकारणाआडचे राजकारण, लपविणे नेहमीच जड होत जाते. समाजकारणाआडचे राजकारण, कधी ना कधी उघड होत...