आजची वात्रटिका
----------------------------
आपली कृषिप्रधानता
हे पोकळ विधान नाही,
हे आमचे निदान आहे.
देश कृषिप्रधान असल्याने,
राजकारण कृषिप्रधान आहे.
खोटे कौतुक केले जाते,
तो जगाचा पोशिंदा आहे.
खेळवण आणि बोळवण,
हाच राजकीय धंदा आहे.
या देशात शेतकऱ्यांचा,
अजून कुणीच खरा वाली नाही !
त्यांच्या उज्वल भविष्याची,
अजून तरी पेरणी झाली नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6044
दैनिक पुण्यनगरी
28जानेवारी2021
