Thursday, February 11, 2021

लफ'डे'खोर !

आजची वात्रटिका
-----------------------

लफ'डे'खोर !

व्हॅलेंटाईन विक म्हणजे,
लफ'डे'खोरांची चंगळ असते.
रोज नव्या नव्या डे मुळे,
सर्व प्रेमवीरांची चंगळ असते.

कुणी आपले जुनेच पाढे,
नव्याने उगळीत असतात.
कुणी आपलेच चॉकलेट,
आपणच चघळीत असतात.

नव्याने प्रपोज करायला,
कुणी दरवर्षी रेडी असतात !
ज्यांचे ज्यांचे होते हसू,
त्यांच्या हाती टेडी असतात !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------------
फेरफटका-7521
दैनिक झुंजार नेता
11फेब्रुवारी2021

 

No comments:

daily vatratika...24nove2024