Friday, February 19, 2021

शिवबाची आण.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------
शिवबाची आण
शिवबा आपली शान आहे,
शिवबा आपला सन्मान आहे.
शिवबा गाऊ,शिवबा होऊ,
तुला शिवबाची आण आहे.
शिवबा स्वराज्याची तान आहे,
शिवबा सद्गुणांची खाण आहे.
एकतरी गुण लावून घे,
तुला शिवबाची आण आहे.
शिवबा ऐतिहासिक ज्ञान आहे,
इतिहासाचे सोनेरी पान आहे.
पाने वाचत रहा,वेचत रहा,
तुला शिवबाची आण आहे.
शिवबा वर्तमानाचे भान आहे,
शिवबा भव्यत्वाची जाण आहे!
शिवबा संकुचित करू नको,
तुला शिवबाची आण आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6066
दैनिक पुण्यनगरी
19फेब्रुवारी2021

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...